सडावन विकासो च्या चेअरमन पदी वसंत पाटील तर व्हाईस चेअरमन पदी छायाबाई पाटील

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील सडावन येथील विकासो च्या चेअरमनपदी रढावन येथील वसंत आनंदा पाटील यांची तर व्हॉइस चेअरमन पदी सडावन च्या छायाबाई पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली.
सडावन,रढावन,चाकवे, सुंदरपट्टी,हेडावे, राजोरे, या सहा गावांची एकत्र मिळून ही सोसायटी असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
निवडीवेळी संचालक भास्कर पाटील (सुंदरपट्टी),अशोक पोपट ब्रम्हे (हेडावे), भास्कर रामदास पाटील (हेडावे),गंगाराम व्यंकट पाटील ( सडावण बु.),राजीवकुमार रमेश पाटील (सडावण बु.),अशोक त्र्यंबक पाटील (सडावण बु.),रंगलाल बाबुलाल पाटील (चाकवे),हिरालाल यशवंत धनगर (सुंदरपट्टी), सुनिल विनायक पाटील (सडावण खु.), श्रीमती मालुबाई लहू पाटील (रढावण),मनिलाल धोंडू पाटील (राजोरे) हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगताप यांनी काम पाहिले त्यांना सचिव
विजय शेखनाथ पाटील,क्लार्क शामकांत हरी पाटील यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम