जामनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक ला आळा घाला मनसे चे तहसीलदार यांना निवेदन*

बातमी शेअर करा...

जामनेर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक ला आळा घाला असे निवेदन मनसे ने तहसीलदार यांना दिले.

सविस्तर  वृत्तअसे की , जामनेर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील गौण खनिज हा विषय खूपच गंभीर आहे , त्यात जामनेर तालुका प्रशासनाने जणूकाही या विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष च केले आहे की काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती ,मुरूम ,माती , खडी वीटभट्टी साठीची माती ,वृक्षांची कत्तल ही अनाकलनीय आहे झाडांची कत्तल व मुरूम व माती यांची भरमसाठ अवैधरित्या वाहतूक होत असल्याने शासनाची दिशाभूल होऊन शासकीय तिजोरीत कर येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे , अवैध वाळू उपसा व वाहतुकीने तर कहर च केला आहे या आणि हे सर्व कुणाच्या राजाश्रयाने होत आहे हे पण पाहणे आवश्यक आहे संबंधित अवैध गौण खनिज , वाळू , माती , मुरूम ,खडी व झाडांची होत असलेली कत्तल यांना तात्काळ ब्रेक लागणे आवश्यक आहे व यातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास तात्काळ थांबायला हवा यासाठी मनसे चे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे

यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष दत्ता पाटील , नाना शिंदे , किरण सौदागर , सागर जोशी , विनोद चव्हाण , अरुण भोसले , जगदीश कुरकुरे ,मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , मनविसे उपाध्यक्ष आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम