महाआंदोलन – आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनाचा १२ वा दिवस
मुख्यमंत्र्यांनी भेटीची तारीख व वेळ द्यावी – जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी
चोपडा – महाराष्ट्र राज्यात आदिवासी कोळी अनुसूचित जमातींचे विपुल प्रमाण असून भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही या जमातींना त्यांचा संविधानिक अधिकार मिळालेला नाही.
परिणामतः आजही या सर्व जमाती शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाअभावी देशोधडीला लागलेले आहेत. आमच्या आदिवासी कोळी अनुसूचित जमातींना केवळ आदिवासी विकास विभागाचे अनागोंदी कारभारामुळे आमचे हक्क मिळण्यास प्रचंड अडचणी निर्माण झालेले आहेत.
तर काही बाबतीत कायद्यामध्ये समजून उमजुन असंविधानिक अनियमितता निर्माण केल्या गेलेले आहेत. म्हणून आमच्या अडचणींवर संविधानिक कायद्यांच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांच्या आधारे तातडीने गांभीर्यपूर्वक चर्चा करून व कायद्यात निर्माण केलेल्या अनियमितता दूर करून आमचा प्रश्न कायमचा सोडवता येऊ शकतो.
अशी माहिती राज्यस्तरीय महाआंदोलनाचे निमंत्रक एडवोकेट शरदचंद्र जाधव (पुणे) यांनी दिली आहे.
मंत्रालयासह महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ जानेवारी पासुन राज्यव्यापी महाआंदोलन सुरू आहे. आज १२ दिवस झालेत परंतु शासन प्रशासनाने अजुनही दखल घेतलेली नाही.
म्हणूनच ह्या अतिसंवेदनशील विषयावर अभ्यासपूर्ण कायदेविषयक चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समितीच्या शिष्टमंडळास मुख्यमंत्री महोदयांनी एक दिवस आधी किमान एक ते दीड तासाची पूर्वनियोजित वेळ द्यावी,
अशी मागणी राज्यस्तरीय महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.
याबाबत शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनास जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे, संभाजीराव सोनवणे जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी प्रहार संघटना, नगरसेवक भरत सपकाळे,
उपोषणकर्ते पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगलाताई सोनवणे, भिकन नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, सागर सपकाळे, अनिल कोळी, जगदीश सोनवणे, सचिन सोनवणे, बबलू सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी,
जितेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, नारायण सपकाळे, रवींद्र कोळी, शिवाजी सूर्यवंशी, आनंद सपकाळे, अक्षय सोनवणे, गणेश बाविस्कर, संजू बाविस्कर, समाधान नवले, संजय सूर्यवंशी, सागर सोनवणे, प्रमोद सोनवणे, किशोर सोनवणे, संतोष कोळी,
Also Read:👇
श्रमसंस्कार शिबिर – राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘हिवाळी विशेष श्रम-संस्कार शिबीराचे’ उत्साहात उदघाटन
दत्तू कोळी, एकनाथ कोळी, शोभा कोळी, राजमाला सपकाळे, मधुकर ईचवे, दिगंबर सपकाळे, मोहन इंगळे, मोहित सोनवणे,
प्रकाश सोनवणे, विजय सपकाळे, रमेश कोळी, राजू कोळी, देविदास कोळी यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Also Read:👇
श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त नागरिकांना मोफत साखर व डाळ वाटप
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम