सोमवारपासून बारावीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखा यापूर्वी जाहीर केल्या होत्या. ऑनलाइन अर्ज हे सरल डेटाबेसवरून भरावयाचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. दरम्यान, राज्य मुक्त विद्यालय •मंडळामार्फत इयत्ता पाचवी व आठवीसाठी नावनोंदणी प्रवेश अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम