आरबीआयच्या निर्णयानंतर बाजारात तेजी तर सेन्सेक्स वाढला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पॉलिसी रेपो दर यथास्थिती ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वधारले. आर्थिक, रिअल्टी आणि ऑटोमोबाईल कंपन्यांसारख्या व्याजदर संवेदनशील क्षेत्रांचे शेअर्स विशेषतः वाढले. आशियाई आणि युरोपीय बाजारातील मजबूत ट्रेंडमुळेही गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. सेन्सेक्स ३६४.
०६ अंकांनी वाढून ६५,९९५.६३ अंकांवर बंद झाला.

दिवसाच्या व्यवहारात तो ४६४. २४ अंकांनी झेप घेऊन ६६,०९५. ८१ अंकांवर पोहोचला निफ्टी १०७.७५ अंकांनी वाढून १९,६५३.५० अंकांवर बंद झाला. साप्ताहिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, सेन्सेक्स १६७.२२ अंकांनी वधारला आणि निफ्टीने १५.२ अंकांची वाढ नोंदवली.

नुकत्याच झालेल्या सत्रात घसरणीनंतर सर्वांच्या नजरा रिअॅल्टी समभागांवर होत्या. व्याजदरात कोणताही बदल न केल्याने रिअल्टी क्षेत्रातील विक्री वाढू शकते, विशेषतः सणासुदीच्या काळात. आरबीआयने सूचित केले की, ते लक्ष्याच्या जवळ किमती आणण्यासाठी बाँड विक्रीचा वापर करतील. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह सहा टक्के, बजाज फायनान्स ४ टक्के, टायटन २.९८ टक्क्यांनी वाढले.

याशिवाय इंडसइंड बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि मारुतीमध्ये लक्षणीय वाढ झाली. दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक घसरले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी निव्वळ १,८६४.२० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम