शिंदे सरकारची एस.टी.महामंडळाला ३०० कोटीची मदत
दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ । महाविकास आघाडीच्या सत्तेत एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांनी केलेला बंद खूप दिवसांनी शमला होता परतू त्यावर ठोस तोडगा मात्र निघाला नव्हता. सध्या राज्यात शिंदे सरकारने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारनं द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिला आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. परंतु तीन महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त 600 कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून 738 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त 300 कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम