पोलीस कोठडीतून ४ कैदी पहाटे फरार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक कारागुहातून कैदी पळून गेल्याच्या घटना आता काही नवीन राहिलेल्या नाही अशीच एक घटना आज दि.८ रोजी घडली आहे. हि घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यातून सुमारास ४ कैद्यांनी पलायन केलं आहे. कारागृहाचे गज तोडून हे चारही कैदी फरार झाले आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात ४ कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. बुधवारी पहाटेच्या सुमारास या कैद्यांनी कारागृहाचे गज तोडून धूम ठोकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची झोपच उडाली. फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम