इस्त्रायलवर तासभारत ५ हजार रॉकेट हल्ले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

सकाळी ४ वाजल्यापासून गाझा पट्ट्यातून हमास दहशतवादी संघटना इस्त्रायलच्या प्रदेशावर हल्ला करत आहे. इस्त्रायलमध्ये परिस्थिती स्फोटक बनली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्त्रायल हादरला असून स्टॅट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे. रॉकेट हल्ल्यात आतापर्यंत चार नागरिकांना मृत्यू झाल्याची माहिती इस्त्रायल प्रशासनाने दिली आहे.
सकाळी हमास दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून रॉकेट हल्ला सुरु केला.

दोन तासांमध्ये तब्बल ५ हजार रॉकेट इस्त्रायलच्या प्रदेशात डागण्यात आले. तसेच अनेक दहशतवाद्यानी घुसखोरी केली. त्यामुळे सकाळच्या अलर्टच्या भोंग्यानीच इस्त्रायलच्या नागरिकांना जाग आली. अद्याप रॉकेट हल्ल्या सुरु असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

 

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हमास दहशतवादी संघटनेने गेल्या काही वर्षात केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रधारी दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत आहेत. दुसरीकडे रॉकेट हल्ला सातत्याने सुरु आहे. इस्त्रायलचे भारतातील राजदूतांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची परिस्थिती सामान्य नाही, पण इस्त्रायल याचा सामना करेल. इस्त्रायलवर दोन्ही बाजूंनी हल्ला सुरु आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे आणि रॉकेट हल्लाची सुरु असल्याचं ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम