मोठी बातमी : भाजप नेत्याच्या चारचाकीचा अपघात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३
राज्यातील महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका संपत नसताना आता भाजप नेते व माजी आ.विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक झाली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजप नेते आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेवून ते अमरावतीकडे निघाले होते. यावेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विजयराज शिंदे यांच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम