छगन भुजबळांची शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील राष्ट्रवादीत पडलेल्या दोन गटात आता न्यायालयात प्रकरण सुरु असतांना अजित पवार गटाकडून शरद पवारांवर टीकास्त्र सोडले जात आहे. नुकतेच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी छगन भुजबळ, सुनिल तटकरे, नरहरी झिरवळ आदी नेते ही त्यांच्यासोबत आहेत. वणी येथे सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतल्यानंतर कळवण येथील शेतकरी मेळाव्याला अजित पवार आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी पक्ष घडवण्यात आमचाही खारीचा वाटा असल्याचं ते म्हणाले. आदरणीय नेते पवार साहेब म्हणाले होते, ते कोर्ट कचेरी करणार नाही, आणि तेच तिकडे गेले. माझ्याच बंगल्यावर पक्षाचं नाव आणि चिन्हं ठरवलं होतं. शरद पवार हे म्हणतात ते संस्थापक अध्यक्ष आहेत, पण मग मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? तुमचा मोठा वाटा पण आमचा पण खारीचा वाटा आहे की नाही ? असा सवाल भुजबळांनी मेळाव्यात उपस्थित केला. दरम्यान भाजपसोबत सत्तेची चूल मांडल्यानंतर राजकीय वर्तुळातून आणि नागरिकांकडून अजित पवार गटाकडून टीका केली जाते. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, भाजपसोबत आम्ही विकासकामांसाठी गेलो आहोत, हे वारंवार सांगितलंय. आम्ही आधीही कामे केली आहेत. पण आता आमच्यावर टीका केली जातेय. दरम्यान सगळे आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत. एक आमदार हा ३ लाख लोकांचे प्रतिनिधी करणारा आहे. न्यायाचा तराजू अजित दादांच्या बाजूनेच सुटणार, असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम