८० वर्षीय महिलेच्या मेंदूतून निघाली सुई
बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३
जगभरात अनेक शस्त्रक्रिया डॉक्टर करीत असतात व अनेकदा धक्कादायक खुलासे देखील झाले आहे. सध्या रशियातील एका ८० वर्षीय महिलेच्या मेंदूतून ३ सेंटीमीटर लांबीची सुई काढण्यात आली आहे. ही महिला लहानपणापासून सुई मेंदूत घेऊनच जगत होती. डॉक्टरांना सीटी स्कॅनमध्ये सुई सापडली. हे कदाचित भ्रूणहत्येच्या प्रयत्नाचे प्रकरण असू शकते, असे आरोग्य विभागाचे मत आहे.
महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या बालपणी तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, पण तो अयशस्वी ठरला. नंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी सुई काढण्याचा प्रयत्न केला नाही. रशियातील दुष्काळाच्या काळात अशी प्रकरणे सर्रास आढळून आली, असे रशियातील सखालिन या दुर्गम भागातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान महिलेच्या पालकांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला असावा. महिलेला जन्मापासून सुई घेऊन जगावे लागले. गुन्ह्याचे पुरावे लपवण्यासाठी अशा पद्धतींचा वापर केला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनमध्ये अन्नाची तीव्र टंचाई होती. महिलेच्या डाव्या पॅरिटल लोबमध्ये सुई घातली गेली. आश्चर्य म्हणजे त्याचा तिच्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेने कधीही डोकेदुखीची तक्रार केली नाही. तिला धोकाही नव्हता. आता त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. २००९ मध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो येथील ७२ वर्षीय व्यक्तीच्या नाकातून एक खिळा काढण्यात आला होता. सुमारे ३० वर्षे तो अडकला होता. त्या व्यक्तीने असह्य वेदना होत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली असता, नाकात लोह असल्याने वेदना होत असल्याचे दिसून आले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम