रक्तदान करून आ.बच्चू कडू यांनी दिला पाठींबा
बातमीदार | १ नोव्हेबर २०२३
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाडी सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील गेल्या ७ दिवसापासून उपोषण सुरु केले असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अपक्ष आमदार बच्चू कडू आज मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे रक्तदान करून पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाच आंदोलन हे उग्र रूप घेत असून अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड पाहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालय व गाड्या जाळल्याचा प्रकारही घडला. तर काही गावांमध्ये राजकीय लोकांना गावबंदी सुद्धा करण्यात आली. मात्र आंदोलनाला वेगळे वळण देऊ नये. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून मराठा समाजाने टोकाची भूमिका घेऊ नये. मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला वेळ द्यावा. कारण त्यांची प्रकृती चांगली राहिली तर आंदोलन अधिक मजबूत होईल; असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांची प्रकृती चांगली रहावी यासाठी आंदोलनाला पाठिंबा म्हणून रक्तदान करण्यासाठी जात असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.
दोन दिवसाआधी जरांगे पाटलांनी उपोषण दरम्यान पाणी प्यावं आणि त्यांच्या लढ्याला आम्ही पाठिंबा देत आहोत, असं सांगितल्यानंतर थेट जरांगे पाटलांनी अंतरवाडी सराटी येथून आमदार बच्चू कडू यांचे आभार मानले होते. मात्र आज आम्ही रक्त सांडून नाहीतर रक्त देऊन या आंदोलनाला पाठिंबा देऊ असं सांगत थेट बच्चू कडू यांनी या आंदोलनाच्या पाठिंबासाठी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार बच्चू कडू मतदारसंघातून शिंदखेड राजाकडे निघाले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम