दसऱ्या आधीच सोन्याच्या भावात मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७  ऑक्टोबर २०२३

देशभरात गेल्या दहा दिवसापूर्वी सोन्याच्या भाव हा गडगडला होता. मागील दोन महिन्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. इस्त्राइल- हमास युद्धाचा परिणाम काही प्रमाणात सोन्या-चांदीवर दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीचे भाव कोसळले होते. अशातच युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर झाल्यामुळे भाव झपाट्याने वाढले. आखाती देशातील वाढत्या तणावामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

काल सोन्याच्या दरात किचिंत घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु आज सोन्याच्या भाव वाढला आहे. सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते इस्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या दारात आखणी वाढ होण्याची शक्यता आहे.

आज सोन्याच्या भाव ६० हजारांवर पोहोचला असून दसऱ्यापूर्वीचं सोनं अधिक महाग होण्याची शक्यता आहे. अशातच सोन्याच्या भाव हा दिवाळीपर्यंत आणखी वाढू शकतो. सणासुदीच्या काळात वाढत्या भावामुळे दुकानदारदेखील त्रस्त आहेत. एक्सपर्ट्सच्या मते, सोन्याच्या भावात येत्या काही दिवसात २५०० ते ३००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पितृपक्षात सोन्याचा भाव ५७ हजारांवर आला होता अशातच सोन्याचे दर पुन्हा ६० हजारांवर आले आहेत. दिवाळीपर्यंत हे दर कायम राहू शकतात किंवा आणखी वाढू शकतात. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६०,२५० रुपये आज मोजावे लागणार आहे. तर चांदी 71,135 रुपये प्रति किलो झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम