आज या राशींना होणार आर्थिक लाभ ; आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

मेष : आर्थिक लाभ मिळेल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

वृषभ : गुंतवणुकीतून फायदा. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळेल. जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता.

मिथुन : खर्च जपून करा. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील. जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.

कर्क : प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. परदेशातील व्यापाराने जोडलेल्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करू शकतात. जोडीदारासोबत प्रेमाची अनुभूती घ्याल.

सिंह : खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे दिवसभराचे बेत रखडतील. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

कन्या : आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस चांगला. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल.

तूळ : आर्थिक लाभ होईल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आजचा दिवस लाभदायक. जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

वृश्चिक : आर्थिक चिंता येऊ शकते. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. जीवनसाथीला अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

धनु : गुंतवणुकीतून फायदा संभवतो. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. कुटुंबातील लोकांना वंळ दिल्याने आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत सुसंवादाची आवश्यकता आहे.

मकर : कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो.

कुंभ : अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात.

मीन : धन लाभ होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम