बड्या नेत्याचा दावा : मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार होणार अपात्र !
बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुरु असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याच गटाचा विजय होईल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होईल, असा दावा ठाकरे गटाच्या एका मोठ्या नेत्याने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर या सुनावणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या सुनावणीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे चंद्रकांत खैरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. आमची सत्याची बाजू आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल, असे ते म्हणाले.
16 आमदारांच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. आमची सत्याची बाजू आहे. उद्धव ठाकरे एकदम संयमी नेते आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा विजय झालाच पाहिजे. त्यांचा विजय होईल, असे मी म्हणत नाही, तर त्यांचा विजय झालाच पाहिजे, असे मी म्हणतोय. कारण होईल म्हटले की, तुम्हाला कसे माहीत? असे विचारले जाईल, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. “तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम