खळबळजनक : राम मंदिराला बाॅम्बने उडविण्याची धमकी !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० सप्टेंबर २०२३

देशातील कोट्यावधी भाविकांची श्रद्धा असलेले अयोध्या येथील श्री राम मंदिराचे युद्ध पातळीवर काम सुरु असतांना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राम मंदिराला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला धमकी दिल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या १४ वर्षीय मुलाला बरेली येथून ताब्यात घेतलं आहे. हा मुलगा इयत्ता आठवीत आहे. १४ वर्षीय मुलाने ११२ या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. चौकशी दरम्यान या मुलाने युट्यूबवर राम मंदिर होत असल्याचं पाहिलं, त्यानंतर त्याने ही धमकी दिल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची झोप उडाली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर गुप्तहेर खातं आणि सायबर खात्याने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करत एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या मुलाची चौकशी केली. या मुलाने चौकशीत सांगितलं की, युट्युबवर राम मंदिर तयार होत असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलीस या मुलाची आणखी चौकशी करत आहेत. या मुलाने धमकी दिल्यानंतर घाबरून मोबाईल बंद केला होता. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने या मुलाचा शोध घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम