खडसे करतील पाटलांना “चॅलेंज”; राजकीय वातावरण तापणार!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाने भूषविले गेले आहे. या पदाच्या प्रथम लढतीत गिरीश महाजन हे त्यांचे विरोधक मानले जात होते. मात्र आता दुसऱ्या लढतीत गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी एकनाथराव खडसे मैदानात उतरले आहे. दोन्ही नेत्यांत राजकीय सख्य नसल्याने पाटील खडसेंच्या आव्हानाचे शिवधनुष्य कसे पेलणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मविआतुन पाय काढत शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजप पक्षासोबत युती करत महाराष्ट्रात सत्तेचा जम बसविला. यामुळे मागील तीन महिन्यांत गुलाबराव पाटील यांचे विरोधकही बदलले आहेत. खडसे यांचा जिल्ह्यात दबदबा असून, वेळोवेळी त्यांनी त्यांचा प्रभावीपणा दाखवून दिला. विधानपरिषदेतील भाषणांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण स्वभावाचे व त्यांच्यातील कट्टर, कडवट विरोधकाचे दर्शन सर्वश्रुत आहे.

दरम्यान, खडसे यांनी भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला केल्यानंतर शिवसेनेमध्ये गुलाबराव पाटील असतानाही आणि राज्यात राष्ट्रवादी-शिवसेनेची मविआ सरकार असतानाही खडसे – पाटील यांच्यातले राजकारण कमालीचे तापले होते.

परंतु सध्याची लढत ही गुलाबराव पाटील यांच्यासाठी एक मोठे अग्निदिव्य ठरणार आहे. कारण, शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे त्यांचे जुने शिवसेनेचे सहकारी त्यांच्याविरुद्ध गेले आहेत. आता पाटील यांना शिवसेनेचे कार्यकर्ते व खडसेंसारख्या मजबूत नेत्यास लढा द्यायचा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम