पोलीस निरीक्षकाने संपविले जीवन ; सुसाईट नोटमध्ये अधिकाऱ्यांची नावे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील पोलीस विभागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधील पोलिस निरीक्षक आनंद मळाळे यांनी जीवन संपवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली. API आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते. कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचचले असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद मळाळे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्या चिठ्ठी मध्ये आपण आत्महत्या का करत आहोत? याचा स्पष्टपणे उल्लेख आनंद मळाळे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाच्या वतीने कुटुंबाला वेळेवर मदत मिळावी. यासह अनेक गोष्टीचे उल्लेख केलेले आहे व काही वरिष्ठ अधिकाऱ्याचे सदरचिट्टीमध्ये नाव आहे. नांदेडमधील पोलिस निरीक्षक आनंद मळाळे हे मागच्या महिन्यात ते आजारी असल्यामुळे रजा घेऊन सोलापुरातील घरी आले होते. आज पहाटे चारच्या सुमारास ते घराबाहेरील अंगणात गेले. यावेळी आपल्या सर्विस रिवाल्वरमधून त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. त्या वेळी त्यांच्या पत्नी या घरातच होत्या. आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिल्यानंतर त्यांना आनंद मळाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम