दोन दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात विक्रमी घसरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही महिन्यापासून देशात वाढत असलेल्या महागाई मोठ्या प्रमाणात सुरु असतांना सोन्याच्या दरात विक्रमी घसरण दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी बाजार पेठेत गर्दी केली आहे. तसेच, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे.

भारतात सोन्याचा दर – भारतातील वायदा बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेन्ज अर्थात एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा दर 59550 रुपयांवर खुला झाला. सोन्याचा दर सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी घसरणीसह 59411 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला होता. व्यापार सत्रादरम्यान हा भाव 59402 रुपयांवर आला होता. गेल्या शुक्रवारी हा दर 59527 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्य मते सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण बघायला मिळू शकते.
चांदीही स्वस्त – चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून येत आहे. आज चांदी 72280 रुपयांवर खुली झाली. यानंतर, चांदीचा दर 426 रुपये प्रति किलोग्रॅमच्या घसरणीसह 72052 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होता. यानंतर तो 72026 रुपयांवर आला. यापूर्वी, शुक्रवारी चांदीचा दर 72478 रुपयांवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, चांदीचा दर 70 हजार रुपयांवरही येऊ शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम