आ.रोहित पवारांचा दावा : शिंदेंचे सर्व खासदार कमळावर लढवणार निवडणूक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिवसेना पक्षावर सत्तासंघर्ष सुरु असून आता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासह रोहित पवार यांनी शिंदे गटाला सूचक इशारा दिला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार देखील उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरू आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याचा दावा अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यात कल्याण लोकसभा मतदार संघावरुनही भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत वाद असल्याचा दावा अनेकदा केला जातो. यावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून या क्षेत्रात भाजप आणि शिंदे गट यांच्यात वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यातच कल्याण लोकसभा क्षेत्रावर सध्या भाजपच्या वतीने दावा करण्यात येत आहे. यावरुनच आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे स्वतः ज्या मतदार संघाचे खासदार आहेत, तिथेच भाजप बैठका घेत. तसेच त्या मतदार संघावर दावा करत आहेत. त्यामुळे भाजपच्या मनात काय आहे? याचा काही प्रमाणात अंदाज ये असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ही जागा भाजप मागू शकतो किंवा श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘भाजपची प्रवृत्ती हीच आहे, लोकनेत्याला जवळ करायचे आणि संपवायचे. भाजपचे राजकीय दृष्टिकोनातून स्वतःचे जे लोकनेते होते मुंडे साहेबांपासून खडसे साहेबांपर्यंत अनेक नेत्यांना संपवले. तसेच दुसऱ्या पक्षातून त्यांच्याकडे येतात त्यांनाही ते संपवतात.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम