राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात रंगले राजकारण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये दोन गट झाल्यानंतर या दोन्ही गटात मोठे वाक्ययुद्ध सुरु असतांना रोहित पवारांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, अजित पवार गटातील काही नेते विरोधी पक्षातील आमदारांचे महत्त्वाचे काम करण्याच्या मोबदल्यात त्यांची स्वाक्षरी घेत आहेत. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून नेत्याना धमकावणे चुकीचे आहे. शेवटी आमदारांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी निधीची गरज असते. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतीउत्तर दिले आहे.

छगन भुजबळ म्हणाले कि, आमच्यात ब्लॅकमेलिंग करणारा एकही व्यक्ती नाही. उलट रोहित पवारांसह सर्वांनीच सरकारमध्ये जाण्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार विरोधी पक्षाचे आमदार असल्याचे सिद्ध करण्यासाठी आमच्यावर असे आरोप करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पक्ष शरद पवार व अजित पवार या 2 गटांत विभागल्यानंतर सध्या रोहित पवार यांनी अजित पवार गटावर थेट टीका करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचा 1 आमदार व खासदार अजित पवार गटात जाण्याची बातमी फुटल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांच्या गटावर ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला होता. यासंबंधीच्या एका पत्रावर रोहित पवार यांच्यासह सर्वांच्याच स्वाक्षऱ्या होत्या, असे भुजबळ म्हणाले. विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका सुरू आहे. ते त्यांचे काम करत आहेत. विरोधी पक्षात असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांना टीका करावीच लागते, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम