शिंदेंना मोठा धक्का! बच्चू कडू यांचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ७ एप्रिल २०२४ | अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झालेले दिसून आले आहेत. बच्चू कडू यांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे. अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी बच्चू कडू प्रचाराच्या तयारीला देखील लागले आहेत.

 

बच्चू कडू यांनी रामटेक मध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

यासंदर्भात बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती. या प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू मात्र नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. त्यांच्यासाठी मते मागणार नाही. असे कडू यांनी म्हटले होते. मात्र, आता बच्चू कडू यांनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम