संशयास्पद आर्थिक योजनेत पैसे गुंतवू नका ; वाचा आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

मेष : ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.

वृषभ : गुंतवणुकीतून फायदा. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. तुमचा जोडीदार रोमँटिक होऊ शकतो.

मिथुन : धन हानी होऊ शकते. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आजचा दिवस कुठल्या धार्मिक स्थळाला समर्पित करणे.

कर्क  : कामाचा ताण घेऊन दमून जाऊ नका. आर्थिक चणचण जाणवेल. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल.

सिंह  : संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आज धार्मिक कामात तुम्ही वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज खूप चांगला दिवस.

कन्या : तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.

तूळ  : वडिलांचा सल्ला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करु शकते. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवा. सामाजिक कार्यक्रमात जाणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : अनेक माध्यमातून आर्थिक लाभ. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका. मित्रांबरोबर वेळ घालवाल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. प्रलंबित कामे आज पूर्ण कराल. वडिलांसोबत अविस्मरणीय क्षण घालवाल.

धनु  : तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. पैशांची स्थिती सुधारेल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण इतरांच्या कामात लुडबूड करु नका.

मकर  : कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. कामाचा ताण जाणवेल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. आजचा दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक. खर्चांवर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. कामाच्या ठिकाणी सुयोग्य कर्मचाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता.

मीन  : गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहू नका. वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज मिळतील. कुटुंबियांकडून आनंदाची बातमी मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम