बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य : मराठा आरक्षणावर म्हणाले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३

देशात आपल्या भविष्यवाणीतून व चमत्कारातून चर्चेत आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री हे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.

आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराज म्हणाले.

मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सरकारने त्यांच्याशी (मराठा बांधवांसोबत) चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असंही बागेश्वर धाम बाबा म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम