भरधाव ट्रक घुसला घरात; अन् होत्याचे नव्हते झाले….

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । रस्ते अपघाताच्या अनेक प्रकारच्या घटना आपण ऐकल्या असतील, मात्र नांदेड येथे घडलेली रस्ते अपघाताची ही घटना वाचून आपल्याला माणूस आता घरातही सुरक्षित नसल्याचा प्रत्यय येईल. या विचित्र अपघाताच्या घटनेत एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यातील पारडी मक्ता गावात सोमवारी सकाळी घडलेल्या ह्या घटनेत चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेल्या या ट्रकने रस्त्याच्या कडेला पार्क असलेल्या दोन दुचाकींचा चुराडा केला. त्यानंतर एका घराची संरक्षक भिंत तोडून तो थेट त्या घरात शिरला. धडकेमुळे घराची भिंत पडली व यात वर्षा मदने (वय २०) ही तरुणी जागीच ठार झाली.

दरम्यान, अर्धापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी चालकाची यथेच्छ धुलाई केली व त्याला पोलिसांच्या हवाली केले. मात्र तोवर वेळ निघून गेली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम