सावधान! “हा” मेसेज व्हायरल कराल तर महागात पडणार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याचा संदेश सोशल मीडिया माध्यमांतून प्रसारित होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून याची पडताळणी केली असता, जिल्ह्यात अशी कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

जर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी पोस्ट अथवा मेसेज व्हायरल करत असेल तर सर्वात आधी संबंधित पोस्ट अथवा मेसेज करणाऱ्या व्यक्तीची खातरजमा करावी व जवळच्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती द्यावी.

दरम्यान, या माध्यमांच्या मदतीने असे पोस्ट अथवा मेसेज व्हायरल करून जर कोणी कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करत असेल, तर त्या व्यक्तिविरुद्ध सायबर कायद्यान्वये पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम