‘या’ कंपनीने लाँच केला ‘महाबली’ स्मार्टफोन!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । स्वस्त व दमदार स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ‘टेक्नो’ या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने नुकताच त्यांचा ‘टेक्नो पोवा निओ 2’ हा अतिउच्च क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया काय आहेत टेक्नो पोवा निओ 2 चे फीचर्स….

◆ टेक्नो पोवा निओ 2 चे मुख्य फिचर म्हणजेच त्याची ७०००एमएएच क्षमतेची अतिउच्च बॅटरी, जी १८w च्या चार्जरने चार्ज करता येते.

◆ याचा डिस्प्ले ९०Hz रिफ्रेश रेट असलेला ६.८२-इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच हा टेक्नो फोन अँड्रॉइड १२ वर आधारित हाईओएस ८.६ वर काम करतो.

◆ वेगवान प्रोसेसिंग व मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक हिलिओ जी८५ ऑक्टा-कोर चिपसेटसह ग्राफिक्ससाठी माली जी५२ जीपीयू वापरला गेला आहे.

◆ ६जीबी रॅम व १२८जीबी असलेल्या टेक्नो पोवा निओ 2 स्मार्टफोनची स्टोरेज ५१२जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने वाढविता येते.

◆ फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, यात १६ मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेऱ्यासह डेप्थ कॅमेरा सेन्सरदेखील आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे.

◆ सुरक्षेसाठी यामध्ये फेस अनलॉक व साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह डॉल्बी एटमॉस स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत.

टेक्नो पोवा निओ 2 हा अद्याप भारतात लाँच झाला नसून, हा स्मार्टफोन ४/६४ व ६/१२८ या दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये ब्लु, ब्लॅक व ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम