हिंगोलीच्या जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक लागली आग !
बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३
राज्यभर सध्या हिवाळा सुरु असल्यावर देखील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या अनेक घटना घडत आहे नुकतेच हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना आज सकाळी घडली होती. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचा भडका उडाल्याने आरडाओरड सुरु झाली. घाबरलेले सर्व कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हा परिषदेची इमारत तीन माजली आहे. सकाळी कामकाजाला सुरवात झाल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या मजल्यावरील फर्निचर असलेल्या अभ्यागत कक्षासह व्हिडिओ कॉन्फरन्स रूमला ही आग लागली. काही क्षणात या आगीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शासकीय कामकाज करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने इमारत खाली करत सुरक्षित ठिकाण काढले.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हिंगोली पालिकेच्या अग्नीशामक विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेमधील साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम