दोन रेल्वेचा भीषण अपघात : १३ प्रवाशी मृत तर संख्या वाढण्याची शक्यता !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून देशातील रेल्वे विभाग प्रचंड अडचणीत येत असतांना पुन्हा एक धक्कदायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. रविवारी संध्याकाळी विझियानगरम जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर सोमवारी सकाळी मृतांची संख्या 13 वर पोहोचली. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कंटकपल्ली दरम्यान हा अपघात झाला.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने मागून धडक दिली. ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजीत साहू यांनी सांगितले की, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला. मागून येणाऱ्या विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनच्या चालकाने सिग्नल ओव्हरशूट केला, ज्यामुळे ही धडक झाली.

या धडकेमुळे दोन्ही गाड्यांचे पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती वॉलटेर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली. यातील तीन डबे हे अग्रगण्य ट्रेनचे होते तर दोन डबे मागून येणाऱ्या ट्रेनचे होते. रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले ईस्ट कोस्ट रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये भुवनेश्वरचा समावेश आहे. 0674-2301625, 2301525, 2303069 आणि वॉल्टेअर डिव्हिजन- 0891- 2885914.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम