‘शासन आपल्या दारी’ : आंदोलकांनी नेत्यांच्या फोटोला फासले काळे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेद्र फडणवीस विराजमान झाल्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु आहे पण सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. नेते, मंत्री, आमदार, खासदारांना ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अशात आज यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे.

मराठा आंदोलकांच्या रोषामुळे हा कार्यक्रम होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण काही तरुणांनी या कार्यक्रमाचे बॅनरच फाडून टाकले आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या फोटोलाही काळे फासले आहे.

प्रशासनाने तात्काळ हे बॅनर कार्यक्रमस्थळावरुन हटवले आहेत. मात्र, आंदोलकांचा संताप पाहता मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावतील की नाही? हा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते, अशी माहिती आहे. मात्र, आता छत्तीसगडच्या दौऱ्याचे कारण देत त्यांनी या कार्यक्रमाला येणे टाळल्याचे समजते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम