वाघाची शिकार होवू शकत नाही ; फडणवीस विरोधकांवर बरसले !
दै. बातमीदार । १८ जून २०२३ । राज्यातील नागपूर येथील काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. त्यावेळी आशिष देशमुखांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघ आहेत. कितीही जनावरे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात विरोधकांकडे कोणताही चेहराच नाही. नेतृत्व कुणी करावे, यावरूनच त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नाराज झाली आहे. आपण काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. इतर राज्यांतही तशीच स्थिती आहे. ते एकमेकांनाच पाडण्याची तयारी आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे म्हणणे शब्दश: घेऊ नका. मात्र, ज्याप्रमाणे जंगलात कितीही जनावरे एकत्र आली तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे राजकारणातील वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात. मन की बातच्या माध्यमातून देशातील २३, २४ कोटी जनतेशी ते थेट संवाद साधतात. जनतेशी त्यांची नाळ जुडलेली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार तुम्ही पाहीले आहे. ते केवळ घरीच बसणारे होते. स्वत: शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात केवळ दोनदाच आले, असे शरद पवार म्हणालेत. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मविआचे सरकार गेले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम