ठाकरे गटाच्या नेत्याचे माजी राज्यपालांना अनोखे पत्र !
दै. बातमीदार । १९ जून २०२३ । राज्यात ठाकरे व शिंदे गटात सुरु असलेले राजकारण आता देशभरातील जनतेला पुरते ठावूक झालेले असतांना नुकताच शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक अजब मागणी करणार पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी एक खोचक मागणी केली असून यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करा, असं म्हटलं आहे.
दानवेंनी कोश्यारींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात ‘गद्दार दिवस’ साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळं नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपल्या दिल्लीच्या पातशाहांमार्फत संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावा करावा, मागणी करावी, हे माझे आपणास आवाहन आहे”
काय आहे पत्र ?
आपण महाराष्ट्राचे राज्यपाल असताना अनेकवेळा आपल्या भेटीगाठी झाल्या, आपण महाराष्ट्र असताना ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वारंवार जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम अविरत चालू ठेवलं होतंच! ते कमी की काय म्हणून महाराष्ट्रात आपल्या दिल्लीच्या पातशाहच्या मार्गदर्शनाखाली सुर्याजी पिसाळ, खंडूजी घोरपडे यांच्या गद्दारीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात गद्दारीचं पीक फोफवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. याची परिणीती २० जून २०२२ रोजी शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी गद्दारी करुन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं पाप केलं. ही गद्दीर जाणून घेण्यासाठी जगातील ३२-३३ देशांनी माहिती घेतली.
जर अशा गद्दारीची जगातील एवढ्या देशातील जनतेचं लक्ष वेधलं जात असेल तर हा दिवस जागतीक गद्दार दिन साजरा होऊ शकतो, तो व्हावा म्हणून आपण आपल्या दिल्लीच्या पातशहांमार्फत युनोकडं प्रयत्न करावेत, अशी आपणास विनंती करतो.
आपणास शुभेच्छा!
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम