दै. बातमीदार । २६ नोव्हेंबर २०२२ । शहरातील खंडेराव नगरात मोटारसायकलीचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि.२५) रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील दुर्गा प्रोव्हिजन या दुकानासमोरुन मोटारसायकलीने जात असलेल्या हमीदखान रियासतखान या तरुणाच्या मोटारसायकलीचा कट गणेश शिंदे उर्फ गण्या (वय २२, रा. खंडेराव नगर) च्या दुचाकीला लागला. या कारणावरून गणेश व त्याचे मित्र सनी उमप उर्फ खंड्या (वय २२), प्रवीण पाटील उर्फ भुऱ्या (वय ३०) व एका अज्ञात अल्पवयीन मुलाने येऊन हमीदखान रियासतखान यास शिवीगाळ, बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गणेश शिंदे, सनी उमप, प्रवीण पाटील व अज्ञात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम