विवाहबंधन बनले व्यापार; फसव्या टोळ्यांचा अजब कारभार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । विवाह हे एक असे बंधन आहे, ज्यामुळे दोन वेगवेगळे परिवार एकत्र येतात, सात जन्माच्या गाठी बांधल्या जाऊन पती-पत्नीच्या संसाराचा शुभारंभ होतो. मात्र सातारा येथील काही घटनांमध्ये नवरीमुलगी लग्न होताच विश्वासघात करून पळून जात असल्यामुळे या बंधनाला काळे फासले जात असून, या घटनांमुळे नवऱ्यामुलांची लाखों रुपयांसाठी लुबाडणूक होत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यात घडलेल्या एका घटनेत दोन लाख रुपये घेऊन एक लग्न लावून दिले गेले. नवरदेव-नवरी घरी परतले व सर्वजण झोपी गेल्यावर नवरीने अंगावरील दागिन्यांसह तिच्याबरोबर असलेल्या महिलेसोबत पळ काढला, हा प्रकार समजताच नवरामुलगा व त्याच्या घरातील मंडळींनी सर्वदूर शोधाशोध केली. मात्र कोणीच हाती न लागल्याने अखेर याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात विशेषतः खटाव, सातारा, माण, कोरेगाव या तालुक्यात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. मुलींचे फसवे लग्न लावून देणाऱ्या बऱ्याचशा टोळ्या सक्रिय असल्याने दलालांना पैसे देऊन, मध्यस्थ अथवा अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून लग्न लावणे, हुंडा देणे-घेणे टाळण्याचे आवाहन निर्भया पथकातर्फे केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम