अतिवृष्टीचे पैसे या आठवड्यातच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित… -आ.अनिल पाटलांच्या तहसीदारांना सूचना…

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)आगामी दसरा व दिवाळी हे सण लक्षात घेता शेतकरी बांधवाना अतिवृष्टीचे आलेले अनुदान तात्काळ खात्यावर वितरित व्हावे अश्या सूचना आ.अनिल पाटील यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना केल्या.
अमळनेर मतदारसंघात पातोंडा सर्कल मधील गावांचे 2022 मधील अतिवृष्टीचे अनुदान आणि 2019 मधील 40 गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले असून केवळ तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यास विलंब होत आहे,मात्र दसरा सण तोंडावर आल्याने आमदारांनी तहसीलदारांच्या अनुदान वितरण कामकाजाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी हे सण आनंदात जाण्यासाठी या कामकाजास वेग देऊन दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कशी पडेल ती व्यवस्था करावी अशा सूचना केल्या,यावर तहसीलदारांनी या आठवड्यात संपुर्ण अनुदान वितरण झालेले असेल अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांना दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम