दोधवद गावात आ.अनिल पाटलांकडून विकासकामांचा वर्षाव… -जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते सव्वा कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन..

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील दोधवद गावात आ.अनिल पाटलांकडून सुमारे सव्वा कोटींच्या विकासकामांचा वर्षाव झाल्याने या कामांचे थाटात भूमीपूजन जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिशय महत्वाची विकासकामे मिळाल्याने ग्रामस्थांनी सौ जयश्री पाटील यांचे गावात आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत केले,व सत्कार सोहळा देखील पार पडला, मनोगत व्यक्त करताना जयश्री पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा तसेच त्यांच्या जि प गटात झालेल्या विकासकामांचा आढावा मांडून आगामी काळात अजून बरेच काही करायचे असल्याचे सांगत येथील ग्रामस्थांच्या असलेल्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील अशी ग्वाही दिली.यावेळी सरपंच साहेबराव बुधाजी भोई,उपसरपंच मालूबाई सुरेश पाटील,सदस्य दिलीप शिवदास भोई कल्पना निलेश धनगर साहेबराव सदन साळुंखे, प्रेमसिंग भीमसिंह पाटील , संजय देवराम भोई , संदिप भोई, सुरेश भिका पाटील, साहेबराव गिरधर सैदाणे, बारकू भोई, निलेश गोपिचंद धनगर, संतोष दौलत धनगर, पांडु संजय भोई, गवरलाल दगा भोई, गवरलाल शिवदास भोई, राकेश संतोष भोई, संजय भोई, वना आनंदा सैदाणे, गंभीर सुरजन सैदाणे उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन

2515 अंतर्गत सभामंडप बांधणे- रक्कम 15 लक्ष,2515 अंतर्गत स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे- रक्कम 7 लक्ष,2515 अंतर्गत बस स्थानक बांधणे रक्कम 7लक्ष,जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा करणे रक्कम 58 लक्ष,डि.पी.सी. अंतर्गत- मराठी शाळेला सभामंडप बांधणे रक्कम 15 लक्ष,मातोश्री पानद रस्ता अंतर्गत दोधवद ते हिंगोणेसिम शेत रस्ता करणे रक्कम 24 लक्ष असे एकूण 126 लक्षच्या कामांचे भूमिपुजन यावेळी जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम