
आमदार अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न लावला मार्गी… विद्यार्थ्यांनी आमदारांचे मानले आभार….
अमळनेर(आबिद शेख)अमळनेर बसस्थानकात अनियमित बसफेऱ्यांचा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पास साठी येणाऱ्या अडचणीसंदर्भांत आमदार अनिल पाटील यांनी बसस्थानकात विद्यार्थी व डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून पास साठी एक खिडकी वाढविण्याची मागणी केली.
अमळनेर येथे सध्या शाळा, कॉलेज नियमित सुरू झालेत व अमळनेर डेपो तर्फे पास वितरित करण्यासाठी एकच खिडकी सुरू होती, त्या मुळे शैक्षणिक सवलत पास मिळवण्यासाठी ४ ते ५ दिवस शाळा, कॉलेज बुडवून रांगेत उभे राहून सुद्धा पास मिळत नव्हती, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण पास नसल्यामुळे पूर्ण भाडे खर्च करून आर्थिक भुदंड विद्यार्थ्यांना बसत होता*
वरील समस्या विद्यार्थ्यांनी अमळनेर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयात जावून आमदारांना सांगितली, यावर आमदार महोदय यांनी अमळनेर बस स्थानकात जाऊन डेपो मॅनेजर पठाण यांच्याशी चर्चा केली व पास वितरित करण्यासाठी अजून एक खिडकी वाढवून मिळण्यासाठी मागणी केली.
या मागणी संदर्भात विभाग नियंत्रक जगनोर साहेब यांच्याशी दूरध्वनी द्वारा चर्चा करून पास वितरित करण्यासाठी अजून एक वाढीव खिडकी सुरू करण्याची मागणी केली.
आमदार महोदय यांनी केलेल्या मागणीस तात्काळ प्रतिसाद देऊन विभाग नियंत्रक जगनोर साहेब आज तात्काळ पास वितरित करण्यासाठी दुसरी खिडकी उघडून दिली जाईल असे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी कामगार नेते एल.टी.पाटील, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व एस.टी.महामंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आमदारांचे आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम