आता मुंबईसाठीच खेळणार ‘या’ खेळाडूने दिला निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अजिंक्य इंग्लिश कौंटी खेळण्यासाठी लंडनला जाणार होता, मात्र आता त्याने आपला निर्णय बदलला असून तो गेले चार महिने हिंदुस्थानी संघात खेळत असलेल्या मुंबईसाठी खेळता यावे म्हणून लिसेस्टरशायर कौंटी संघांशी असलेल्या नियोजित करारातून माघार घेतली आहे. त्याने मुंबईच्या प्रेमापोटी घेतलेल्या धाडसी निर्णयाबाबत क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले आहे.

आगामी रणजी मोसमासाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी पुढील दोन महिने तो कसून सराव करणार आहे. आपल्या शरीराचे स्वास्थ्य आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी पुढील दोन महिने खूप महत्त्वाचे आहे. मला शक्य असलेल्या प्रत्येक टप्प्यावर मुंबईसाठी खेळणे हे माझ्यासाठी नेहमीच गौरवाचे आणि अभिमानाचे आहे. मला आगामी हिंदुस्थानच्या राष्ट्रीय क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळेच मी लिसेस्टरशायरबरोबर असलेल्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय स्वीकारला आहे. माझ्या या निर्णयानंतरही लिसेस्टरशायरच्या मी संपर्कात राहीन.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम