अभिनेत्री अनुष्का घेणार पुन्हा एकदा ब्रेक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

सुप्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दुसऱ्यांदा आई- बाबा होणार असल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असतांना काही दिवसापूर्वी पापाराझींनी दोघांनाही मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर एकत्र स्पॉट केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होतेय. सोबतच, अनुष्का दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर फिल्मइंडस्ट्रीतून पुन्हा एकदा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराट हे दोघेही लवकरच चाहत्यांना बाळाची गुड न्यूज देणार आहेत. सध्या तरी याबातमीवर अनुष्का आणि विराट हे दोघेही शांत आहेत. विरुष्काला एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. अनेकदा त्या दोघांनीही आपल्या चाहत्यांसोबत वामिकाचे फोटो शेअर केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराटला पापाराझींनी मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर एकत्र स्पॉट केले होते, परंतु दोघांनीही त्यांना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती.

याबाबत लवकरच जाहीर करु, असे त्यांनी सांगितले. याच कारणामुळे अनुष्का बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्पॉट झालेली नाही. त्यासोबतच मध्यंतरी झालेल्या अनेक पार्ट्यांमध्येही ही जोडी दिसून आली नाही. दरम्यान, अभिनेत्रीची सोशल मीडियावर एक जुनी मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे. एका चॅट शोमध्ये तिने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अनुष्का म्हणते, “माझ्या आयुष्यामध्ये लग्नासाठी महत्वाचं स्थान आहे. मला मुलं झाल्यानंतर मी कदाचित माझ्या कामातून ब्रेक घेईल.” अभिनेत्रीने केलेलं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर कमालीचं चर्चेत आलं आहे. आनंद राय दिग्दर्शित ‘झीरो’मध्ये अभिनेत्री अखेरची दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. २०२१ मध्ये वामिकाचा जन्म झाल्यानंतर अनुष्काने ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये डेब्यु करते. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची शुटिंग संपली आहे. अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. पुन्हा एकदा अभिनेत्री सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार या चर्चा सुरु झाल्यामुळे चाहते बरेच नाराज झाले आहेत. अद्याप याविषयी अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम