अभिनेत्री जेनेलिया देणार गुडन्यूज ; चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रीया
बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्राच्या बॉलीवूड क्षेत्रात एक मराठी जोडी नेहमीच चर्चेत असते. ती म्हणजे रीतेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख डिसुजा यांच्या लोकप्रियतेची गोष्टच वेगळी आहे. आता जेनेलिया एका वेगळ्याच कारणांसाठी नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या, चर्चेचा विषय आहे. त्याचे कारण म्हणजे जेनेलियाचा तो फोटो. त्या फोटोनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.
एका फॅशन इव्हेंटमध्ये ते दोन्ही सेलिब्रिटी गेले होते तेव्हा त्यांच्या उपस्थितीकडे चाहत्यांचे लक्ष होते. जेव्हा जेनेलिया फोटो देण्यासाठी फोटोग्राफर्सकडे आली तेव्हा तिच्या फोटोंनी वेगळ्याच गोष्टीची चर्चा होत आहे. जेनेलिया तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फॅशन इव्हेंटमध्ये त्या दोघांचा तो फोटो बातमीचा विषय झाला आहे. त्याचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २०१४ मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान, त्यानंतर २०१६ मध्ये जेनेलिया दुसऱ्यांदा आई झाली. आता त्या फोटोनं ती पुन्हा तिसऱ्यांदा प्रेग्नंसीच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम