आक्षेपार्ह मजकूर प्रसारित ; दोन गटात राडा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक ठिकाणी सोशल मीडिया पोस्टवरुन राडा होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. अशीच एक घटना सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताऱ्यातील खटाव तालुक्यात सणाऱ्या पुसेसावळी शहरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात दगडफेक झाली. यामुळे पुसेसावळी शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 9.30 च्या सुमारास सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा संपूर्ण प्रकार घडला. ज्यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रित आणली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम