अभिनेत्री कंगना म्हणाली ; मोदी म्हणजे कृष्णाचा अवतार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

सध्या देशात आपल्या विधानाने नेहमीच चर्चेत येणारी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना हि पुन्हा एकदा नव्या विधानाने चर्चेत आली आहे. आता तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच कंगनाचा तेजस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजसच्या निमित्तानं कंगनानं ज्या मुलाखती दिल्या आहेत. त्यात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यामुळे कंगना काही प्रमाणात ट्रोल देखील झाली आहे. कंगनानं मोदींचा उल्लेख कृष्णाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी तिनं मोदींची तुलना भगवान राम यांच्यासोबत केल्याचे दिसून आले होते.

एका मुलाखतीमध्ये कंगनानं पीएम नरेंद्र मोदींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ती म्हणाली, माझे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. ते सर्वशक्तिमान आहेत. तुम्ही मला जेव्हा अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी कुणाला सर्वोत्तम पंतप्रधान मानता असे विचारता तेव्हा मला मोदी यांचे नाव घ्यावेसे वाटते. मी असे म्हणते याला कारण ते देशासाठी खूपच समर्पित भावनेनं काम करतात. मोदीजी आपल्यासाठी एखाद्या अवतारासारखे आहेत. ते साधारण व्यक्तिमत्वाचे नाहीत. त्यांचा जन्म हा देशाचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. जेव्हा कृष्णाच्या विरोधात बोललं गेलं तेव्हा त्याचा मित्र सुदामा धावून आला. त्यानं त्याच्याविषयी सांगितलं. तो देव आहे. असे सुदामा म्हणाला होता. तेव्हा दुर्योधनानं आक्षेप घेत कृष्णाविषयी अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. अशा शब्दांत कंगनानं तिची प्रतिक्रिया दिली अलून अमर उजालानं या विषयी सविस्तर माहिती देणारे वृत्त दिले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम