मराठा समाजाला मिळणार दिवाळीपूर्वी गोड बातमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज नववा दिवस असून आता त्यांनी पाणीदेखील त्यागण्याचा निर्णय घेतला असतांना सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीधीच जरांगे पाटलांना गोड बातमी देणार, असे आश्वासन भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आमदारांनाही आपल्या सरकारला धारेवर धरण्याचा अधिकार आहे. असे असले तरी दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ, असा शब्द नितेश राणे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचे आहेत. ते कांग्रेस सोबत होते याची मला माहिती नाही. तुमच्याकडे काही फोटो असतील तर मला माहीत नाही, असे नितेश राणे म्हणाले. मनोज जरांगे यांना स्क्रिप्ट कोण पुरवते हे आम्हाला उघड करावे लागले असा इशारा नितेश राणे यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता असल्यामुळे ते अपेक्षा करत आहे. ज्याला जास्त आंबे त्यालाच सर्वात जास्त दगड मारले जातात, या म्हणीची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम