मराठा आरक्षणासाठी केंद्रीय गृहंमंत्र्यांनी बोलविले उपमुख्यमंत्र्यांना !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाचे आंदोलन आक्रमक होत असतांना दिसत आहे मात्र यावर अद्याप राज्य सरकारने कुठलाही निर्णय घेत नसल्याने आता केंद्रीय पातळीवर हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. त्यात शहा या दोघांकडून मराठा प्रश्न समजून घेऊन या प्रकरणी एखादा ठोस निर्णय घेतील, असा अंदाज आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, अमित शहा यांच्या दिल्ली स्थित निवासस्थानी दुपारी साडे 3 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे पोहोचणार आहेत. त्यानंतर या तिन्ही नेत्यांत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर धीरगंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. बीडमध्ये राजकीय नेत्यांच्या घरांची जाळपोळ झाल्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना फोन करून स्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर फडणवीस यांनी या घटनेत सहभागी असलेल्यांवर 307 चे गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण त्यानंतर मनोज जरांगे यांनी एकेरी भाषेत सरकार विशेषतः फडणीसांना असे गुन्हे दाखल करून दाखवा, मग मी पाहतो असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यातच त्यांनी बुधवारी रात्रीपासून पाणी पिणेही सोडले आहे. यामुळे स्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम