फोटो डिलीट केल्यावर रिंकूने केला खुलासा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३

गेल्या काही वर्षापूर्वी सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रिंकू राजगुरू यांना अवघ्या राज्याने डोक्यावर घेतले होते. पण ती नेहमीच सोशल मिडीयात वेगवेगळ्या कारणाने देखील चर्चेत येत असते. रिंकूने तिच्या सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्या आहेत, अशी चर्चा होत होती. नेमकं अभिनेत्रीने असं का केलं याचं उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक होते. नुकतंच रिंकूने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत या प्रश्नाचं उत्तर दिलंय.

अलीकडेच रिंकूच्या सर्वच सोशल मिडीयावरील पोस्ट तिने हटवल्या होत्या. सोशल मीडियावर आणि तिच्या चाहत्यांमध्ये त्यावेळी संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अभिनेत्री सोशल मिडीयाला राम राम ठोकते की काय असा सुद्धा अनेकांना प्रश्न पडला होता. अशातच या सर्वांवर अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. अभिनेत्रीने नेमक्या तिच्या सोशल मीडिया पोस्ट कशा काय डिलीट झाल्या, यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितलं की,“सर्वांना नमस्कार. माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आणि आता सर्व व्यवस्थित झालेलं आहे. येत्या काही दिवसांत मी माझ्या अकाऊंटवरून पोस्ट टाकायला सुरुवात करेल. प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाबद्दल आणि दाखवलेल्या काळजीबद्दल मनापासून आभार.” तिने स्वतःहुन एकही पोस्ट झालेली नाही, असं देखील तिने स्पष्ट केलेलं आहे. रिंकू कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल ८ लाखांहून जास्त फॅन्स आहेत.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिंकूने फिल्म इंडस्ट्रीमध्ये २०१६ मध्ये ‘सैराट’मधून डेब्यू केलं. त्यानंतर तिने काही वेबसीरीज आणि चित्रपटांतही मुख्य भूमिका साकारली होती. कागर, झुंड, अनपॉस सह अन्य कलाकृतींमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कोणत्याही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. सध्या तिचा चाहतावर्ग तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम