अभिनेत्री सोनालीने घेतले सुवर्ण मंदिराचे दर्शन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ब्रेक घेत सुट्ट्याचा आनंद लुटत आहे तिच्या सोबत पती हि दिसून आला आहे. सोनाली तिच्या सासर आणि माहेरच्या मंडळींसोबत सध्या पंजाबमध्ये आहे. अमृतसह हे सोनालीचे आजोळ आहे. तिची आई पंजाबी आहे, तर वडील महाराष्ट्रीयन आहेत. त्यामुळे पंजाबसोबत तिचे खूप जवळचे नाते आहे.
सोनाली पंजाबला तिच्या आजीआजोबांच्या घरी गेली आहे. दरम्यान तिने नुकतीच संपूर्ण कुटुंबासोबत सुवर्णमंदिराला भेट दिली. येथील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच तिने लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. लहान असताना दरवर्षी पंजाबला यायचो. तेव्हा सुवर्णमंदिरात येणे व्हायचे. पण आता सहा ते सात वर्षांनी येथे आल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. सोनालीसोबत तिचा नवरा कुणाल, तिचे आईवडील, भाऊ आणि सासूसासरेही यावेळी होते.

सोनालीने फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले, आईचं माहेर, आमचं आजोळ, अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी यायचो सुवर्ण मंदिरमध्ये मग पुढे कॅालेज पासून दोन वर्षांतून एकदा…आणि मग पुढे हे अंतर वाढतंच गेले… यंदा साधारण 6-7 वर्षांनी आलोय अमृतसरला… पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे… #kunal आणि संपूर्ण #benodekar family पण आमच्या बरोबर आहे #kulkarni #kenosona #sonaleekulkarni. आजही या वास्तूबद्दलची श्रद्धा आणि आकर्षण तेवढंच आहे… इथे सगळे समान, no vip lines, no privileges, 24 तास लंगर..” सोनाली पहिल्यांदाच पतीसोबत आजोळी गेली आहे. त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. याआधी तिने वाघा बॉर्डरला भेट दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम