पैसे वाचविण्यासाठी घरात नोकर न ठेवणारी अभिनेत्री !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२  लहानपणी माला यांचे नाव एल्डा होते. त्यांच्यासोबत शाळेत शिकणारी मुलं त्यांना डालडा म्हणत चिडवायची, म्हणून त्यांनी नंतर स्वतःचे नाव बदलून बेबी नजमा असे ठेवले. जेव्हा त्यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपले नाव पुन्हा बदलले आणि माला सिन्हा ठेवले. माला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि संगीताची आवड होती आणि त्यांनी त्याचे प्रशिक्षणही घेतले होते.

BJP add

60 च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 86 वर्षे पूर्ण केली आहेत. माला सिन्हा अशा एक अभिनेत्री आहेत, पण त्यांनी अभिनयासाठी आपले सिंगिंग करिअर सोडले. आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक हिट चित्रपट देणाऱ्या माला त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. परंतु त्यांना त्यांच्या काळातील सर्वात कंजूष अभिनेत्री देखील म्हटले जाते. पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी कधीही घरात नोकर ठेवले नाहीत. त्या सर्व कामे स्वतः करत असे.1978 मध्ये त्यांच्या घरी इन्कम टॅक्सने छापा टाकला आणि बाथरूममधून 12 लाख जप्त केले. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि संपूर्ण 12 लाख जप्त होऊ नयेत, म्हणून वडील अल्बर्ट सिन्हा यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पैसे वेश्याव्यवसायातून कमावल्याची कबुली कोर्टात दिली होती. 5 दशके बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माला सिन्हा यांच्या मुलीला सिनेसृष्टीत त्यांच्यासारखे यश मिळू शकले नाही. म्हणून माला सिनेसृष्टीपासून दुरावल्या.

अभिनय कौशल्य पाहून चित्रपट दिग्दर्शकाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा दिला होता सल्ला नृत्य आणि गायनात निष्णात असण्यासोबतच माला शालेय नाटकांमध्येही भाग घेत असायच्या. एके दिवशी त्यांच्या शाळेत एक कार्यक्रम होता त्याला एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात माला सिन्हा एका नाटकात सहभागी झाल्या होत्या. दिग्दर्शकाने नाटकातील माला सिन्हांचा अभिनय बघितला आणि त्यांना त्यांचा अभिनय खूप आवडला. कार्यक्रम आटोपल्यानंतर दिग्दर्शक माला सिन्हा यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी माला यांच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलीमध्ये उत्कृष्ट अभिनय कौशल्य आहे आणि ती एक सक्षम अभिनेत्री बनू शकते, त्यामुळे तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी द्या. माला यांच्या वडिलांना दिग्दर्शकाचे म्हणणे पटले आणि त्यानंतर माला बालकलाकार म्हणून काम करू लागल्या.

माला सिन्हा यांनी बालकलाकार म्हणून ‘जय वैष्णोदेवी’ या बंगाली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1952 मध्ये आलेल्या ‘रोशनारा’ या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्या अनेक बंगाली चित्रपटांमध्ये झळकल्या. यादरम्यान माला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आल्या. येथे त्यांची भेट गीता बाली यांच्याशी झाली.

गीता बाली माला यांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी दिग्दर्शक केदार शर्मा यांना विनंती केली की, त्यांनी मालाला बॉलिवूडमध्ये फिल्मी ब्रेक द्यावा. गीता यांच्या विनंतीनंतर केदार शर्मा यांनी त्यांच्या ‘रंगीन रातें’ या चित्रपटात माला यांना हिरोईन म्हणून कास्ट केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले, पण त्या चित्रपटांमधून त्यांना विशेष ओळख मिळाली नाही.
अखेर प्रतीक्षा संपली आणि 1957 मध्ये ‘प्यासा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. माला सिन्हाच्या कारकिर्दीत हा चित्रपट खूप हिट ठरला आणि येथूनच त्यांच्या करिअरला आकार मिळू लागला. या चित्रपटात त्या गुरू दत्तसोबत दिसल्या होत्या. मालापूर्वी हा चित्रपट मधुबालाला ऑफर करण्यात आला होता, पण मधुबालाने नकार दिला, त्यानंतर माला यांना या चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम