
कार्यक्रमात येणार उर्फी जावेद-सनी लिओनी एकत्र; धुमाकूळ तर होणारच…
दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२ उर्फी तिच्या नवीन स्टाईलने दररोज इंटरनेटवर धुमाकूळ घालते. आता उर्फी पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. उर्फी जावेद तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. यंदाचा धुमाकूळ हा तिच्या ड्रेसिंग स्टाइलने नाही तर MTV वर सुरू होत असलेल्या स्प्लिट्सव्हिला X4 मुळे होणार आहे. तरुणांमध्ये विशेष चर्चेत असलेल्या या कार्यक्रमात आता उर्फी जावेद दिसणार आहे.
या कार्यक्रमाची होस्ट, सनी लिओनी हीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच माहिती दिली आहे की ‘स्प्लिट्सव्हिला’ हा शो 12 नोव्हेंबरपासून शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होत आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओनीशिवाय अनेक स्पर्धकही दिसत आहेत. त्याचवेळी उर्फी जावेद देखील या शोमध्ये असणार आहे. प्रोमोमध्येही ती दिसत आहे.
“मी अनेक वर्षांपासून MTV ‘Splitsvilla’ शो पाहते आणि फॉलो करतेय. या शो चा भाग होणं हे माझ स्वप्न होत जे आता खरं होताना दिसतंय, असं उर्फी म्हणाली” उर्फी आणि सनी दोघीही प्रचंड लोकप्रिय आहेत. उर्फी आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे तर सनी लिओनी पूर्वी पोर्न स्टार असल्यामुळे दोघींची प्रचंड क्रेझ आहे. आता दोघीही एकाच मंचावर येत असल्याने नेटकरी भलतेच खुश झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम