बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लकी टेलर, डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह समर्थकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १३ एप्रिल २०२४ | जळगाव जिल्हा शिवसेना-उबाठा पक्षात आज बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लकी टेलर व ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मुंबईत प्रवेश घेतला.

काही दिवसांअगोदर भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नंतर करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. तसेच, लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

सदर प्रसंगी, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेषदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम