आदिवासी टोकरे कोळी समाज यांनी खा.रक्षाताई खडसे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

बातमी शेअर करा...

 

 

जळगाव दि ३ सप्टेबंर | जळगांव जिल्हा “आदिवासी टोकरे कोळी जमात” पदाधिकाऱ्यांनी आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे भेट घेऊन जात प्रमाणपत्र तसेच इतर अनेक समस्यांबाबत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

 

रावेर लोकसभा क्षेत्रातील “आदिवासी टोकरे कोळी जमात” पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसा आधी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची कोथळी (मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कोळी समाज बांधवांना शैक्षणिक व शासकीय कामकाजात येणाऱ्या जात प्रमाणपत्राच्या अनेक समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याअनुषंगाने आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनांत अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्या व “आदिवासी टोकरे कोळी जमात” पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते.

 

सदर बैठकीत “आदिवासी टोकरे कोळी जमात” विद्यार्थी व नागरिकांना येणाऱ्या अडचणीबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी तसेच उपस्थितीत प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सविस्तर माहिती देऊन सदर अडचणी सोडविणे बाबत समस्त आदिवासी कोळी समाजाच्या वतीने निवेदन दिले.

 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी तसेच अमळनेर, भुसावळ व फैजपूर चे उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) यांच्यासह अशोक नामदेव कांडेलकर,पुरुषोत्तम कोळी,हरलाल रमेश कोळी,चंद्रकांत तोताराम भोलाणे,शाताराम तोताराम सपकाळे,रंगराव सिताराम देवराज,विनायक दुर्योधन कोळी, आत्माराम सुपडू कोळी,ईश्वर(बंडू) अशोक कोळी, पंकज सुधाकर कोळी,गुणवंत शामराव पिवटे,छगन सिताराम देवराज,गोपाळ यशवंत कोळी,संदीप शिरसाळे,अशोक चिंतामण शिरसाळे,भिका कडू सोनवणे,संजय पांडुरंग सपकाळे, सागर नामदेव कोळी, श्री.गोपाल यशवंत देवराज ई. उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम